*साध्या शब्दांना ताल,सूराची जोड दिली की गाणं तयार होतं—योगीराज माने

——————————————
लोकंदर्शन उस्मानाबाद 👉राहुल खरात

दि.२५ थोडस संवेदनशीलतेने एखाद्या घटनेकडे किंवा प्रसंगाकडे पाहिले आणि आपल्या प्रतिभेने आणि कल्पनेने साध्या शब्दांना ताल—सूरांची जोड दिली तर चांगलं गाणं लिहिता येतं असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाने दि.२३सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय एक दिवसीय—गीतलेखन कार्यशाळेत”दुपारच्या सञात प्रमुख पाहूणे म्हणून सुप्रसिध्द गीतकार मा.योगीराज माने यांनी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे.अध्यक्षस्थानी प्रो.डाॅ.शिवाजीराव देशमुख (मराठी विभाग प्रमुख तुळजाभवानी महाविद्यालय,तुळजापूर)हे होते.सदर कार्यशाळा प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.प्रारंभी मान्यवर व प्रमुख पाहुणे यांनी डाॅ.बापूजी साळुंखे यांचे प्रतिमेचे पुजन केले.यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजीराव गायकवाड म्हणाले की,महाविद्यालयातील विद्यार्थी कवी यांना गाणे लिहिता यावे व ते गाणे कसे कंपोझ केले जाते ते कळावे यासाठी सकाळच्या सञात गितकार प्रा.डाॅ.विनायक पवार यांनी चांगले मार्गदर्शन केले आताच्या सञात गीत कसे तयार केले जाते साध्या शब्दांना गाण्याचे कसे मिटरमध्ये बसवले जाते ते प्रसिध्द गीतकार योगीराज माने सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
पुढे बोलताना योगीराज माने म्हणाले की,मी अनेक मराठी चिञपटांना गाणी लिहिली आहेत परंतु साध्याच शब्दांना ताला—सूरात पकडल्याने गाणं अधिक समृध्द झाले.आपणही अगोदर कविता लिहा सरावातून आपोआपच शब्दधुंदीतून गाणं आकाराला येतं आपण लिहित चला व गीतलेखनाची आवड बाळगावी असे त्यांनी आवाहन केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डाॅ.शिवाजीराव देशमुख म्हणाले की,गाणे गाणे ही आदीम माणसाची प्रवृत्ती होती कविता अगोदरची की गाणे अगोदर असा प्रश्न पडला की गाणे अगोदर असेच म्हणता येईल.यावेळी त्यांनी गाण्यांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना सांगून आजपर्यंतचे श्रेष्ठ होऊन गेलेल्या गीतकारांचा आढावा घेतला.
यावेळी कार्यशाळेतील निवडक सहभागी निवडक विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते प्रमाणपञाचे सन्मानाने वितरण करण्यात आले.
समारोपाप्रसंगी निवडक सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.सूञसंचालन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सौ.फुलसाग एस.एस.प्रा.बोबडे मॅडम यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here