पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व राजुरा युवक काँग्रेसचे आयोजन.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

  1. राजुरा  :– चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व
    राजुरा विधान सभा युवक काँग्रेसच्या वतीने
    दि १७ सप्टेंबर २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे यांच्या नेतृत्वाखाली राजुरा येथील जुना बसस्थानक रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस (National Unemployment Day) म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतिकात्मक केक कापून देशातील बेरोजगार युवकांना देशोधडीला लावण्यास पंतप्रधान मोदी हेच कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
    या प्रसंगी राजुरा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, महासचिव आकाश मावलीकर, निरंजल मंडळ, पंचाळा चे उपसरपंच आकेश चोथले, युवक काँग्रेसचे सर्व महासचिव, सचिव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here