दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची दि. १९ व २० सप्टेंबरला मुलाखत

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

. मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवरून सोमवार दि. 19 सप्टेंबर व मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबईतील चत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी शाळेत राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम याची माहिती दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here