जागतिक सागरी किनारा स्वछता दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी पिरवाडी येथे सागरी किनारा स्वछता अभियानाचे आयोजन .

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

दि 15 सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक सागरी किनारा स्वछता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून Ministry of Earth Sciences, सागरी सीमा मंच, पर्यावरण संरक्षण गतिविधी, भारत सरकार, NSS, कोस्ट गार्ड, इतर मंत्रालये तसेच स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने प्रथमच 7500 कि मी लांबीच्या किनारपट्टीवरील 75 किनारे स्वछ करण्याची 75 दिवसांची मोहीम दि 5 जुलै ते 17 सप्टें पर्यंत चालणार आहे.

सदर मोहीम हि जगातील अशा प्रकारची पहिली आणि सर्वात जास्त काळ चालणारी किनारपट्टी स्वछता मोहीम आहे. ज्यामध्ये सर्वाधिक जनसहभाग आहे. या मोहितेद्वारे समुद्रकिनाऱ्यावर सोडला जाणारा प्रक्रिया न केलेला कचरा, विशेषतः प्लास्टिकमुळे सागरी जीवनाचा होत असलेल्या ऱ्हासाबद्दल जनजागृती करून समाजातील वर्तणुकीत बदल घडवून आणण्याचा हेतू आहे.

ह्या मोहिमेअंतर्गत शनिवार दिनांक 17/9/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत उरण तालुक्यातील पिरवाडी आणि केगाव हे समुद्र किनारी स्वछता मोहीम राबवली जाणार आहे.त्यासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी सर्वप्रथम दिनांक 17/9/2022 रोजी सकाळी 10 वा.हेलिपॅड, पिरवाडी येथे एकत्र जमायचे आहे.तरी सदर सागरी किनारा स्वच्छता मोहिमेमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनेने यात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन सागरी सीमा मंच द्वारे करण्यात आले आहे.इको मित्रम ऍप डाउनलोड करून पूर्व नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्या सहभागी स्वयं सेवकांना मोहिमेनंतर ई प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती सागरी सीमा मंच द्वारे देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here