आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना राजुरा क्षेत्रात पदस्थापना द्या. आमदार सुभाष धोटेंचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– चंद्रपुर जिल्हात आंतर जिल्हा बादलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांना आदिवासी, नक्षलग्रस्त तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागी प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असतानाही चंद्रपुर जिल्ह्यात आंतरजिल्हा पद्धतिने रूजु झालेल्या ६१ शिक्षकांचे दुर्गम क्षेत्रातः असलेल्या जिवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील रिक्त जागी एकही शिक्षक न देता एकप्रकारे शासन निर्णयाचे उल्लंघन केले असल्याची बाब काल झालेल्या बदली प्रक्रिये दरम्यान निदर्शनास आली त्यामुळे दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
जिवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त असुन शैक्षणिक गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. आदिवासी तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासन निर्णयात नमुद असतांना देखिल जिवती कोरपना राजुरा व गोंडपिपरी तालुक्यात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार ही बाब आमदार सुभाष धोटे यांचे निदर्शनास येताच त्यांनी शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांचेशी संपर्क साधुन शासन निर्णयाची आठवण करून शासन निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी अश्या सूचना वजा दिल्या आहेत. शिक्षकां अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तालुक्यातील शिक्षकाच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची कार्यवारी करावी
अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या आहेत. तर नक्षलग्रस्त दुर्गम अवजड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी भरण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here