गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाचे वतीने केला गणेश मंडळाचा सत्कार

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर शहरातील विविध मंडळांनी स्थापित केलेल्या विघ्नहर्ता श्री गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात शनिवारी करण्यात आले. शहर युवक काँग्रेस कमिटी तर्फे भाविकांना महाप्रसादाचे वितरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. सोबतच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार माजी नगर परिषद उपाध्यक्ष सचिन भाऊ भोयर यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष सविता ताई टेकाम, शहराध्यक्ष संतोष भाऊ महाडोळे, नगर परिषद गटनेता विक्रम येरणे, माजी उपाध्यक्ष सचिन भाऊ भोयर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष रुपेश चूदरी, माजी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, सतीश बेतावार,देविदास मुन, राजिक खान, दिपक येवले, विक्की उरकुडे, शंकर क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here