विदर्भ महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे आगमन.

 

लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत

ध्यास नाविन्याचा , शोध नव उद्योजकांचा हा नारा देत महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाच्या स्टार्ट अप यात्रेचे जिवती येथील विदर्भ महाविद्यालयाच्या ni परिसरात आगमन झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस .एच. शाक्य यांनी या यात्रेचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक तालुक्यात उद्योजकता प्रचार व प्रबोधन तसेच जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा याचा प्रसार करण्याकरिता महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या यात्रेचे समन्वयक श्री. श्रीकांत किनारके यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या सभागृहात यात्रेच्या स्वागत समारंभात प्राचार्य डॉ.एस. एच . शाक्य यांनी यात्रेचे औचित्य व उद्देश यावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. संजयकुमार देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. राऊत सर. तेलंग सर. लांडगे सर. पानघाटे सर, साबळे सर, भास्कर पिंपळकर, अनिल नळे, लक्ष्मण शिंदे, गिरीश कांबळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here