Home
Home गडचांदूर / कोरपणा जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव गाव येथील तीन शिक्षकांचे निरोप समारंभ थाटात….

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव गाव येथील तीन शिक्षकांचे निरोप समारंभ थाटात….

..
लोकदर्शन👉 मोहन भारती

आज दिनांक 30 जुलै 2022 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे, श्री. शैलेंद्र तेलंग, श्री. मारोती जीवतोडे, व कु. लता मडावी यांना शाळेतून निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयपाल शालीकराम राऊत, उदघाटक श्री. नारायण जी हिवरकर शा. व्य.स. अध्यक्ष, सत्कारमूर्ती श्री. तेलंग सर, श्री.जीवतोडे सर, कु.लता मडावी मॅडम, तर प्रमुख अतिथी श्री.रमेश चौधरी, श्री. प्रफुल जीवने, श्री. सुरज जुनघरी, कु. प्रियंका भगत, श्री. संजय मनवर, सौ. तारा बाई मेश्राम, सौ.संध्या बाई गेडाम, आदी पाहुणे उपस्थित होते।
या अतिशय भावनिक वातावरणात, ज्या तिघांनी 10 वर्षे या शाळेची निस्वार्थ, अविरत व पूर्ण समर्पणाने सेवा केली, या मुळे निरोप देतांना तिन्ही सत्कारमूर्तीचे , पाहुण्या मंडळीचे, व विद्यार्थ्यांचे मन भरून आले।
मा. नारायण जी हिवरकर यांनी, मागील 10 वर्षात या तिघांचे शाळेला मिळालेले महत्वपूर्ण योगदान बद्दल कौतुक केले, व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राऊत सर, यांनी आपल्या मनोगतात शाळेमध्ये ता तिघांची जाणवत असलेली कमतरता व विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या मनातील तळमळ या बद्दल त्याचें कौतुक केले.
शाळेकडून व वर्ग आठवी, नववी, व दहावी कडून सुद्धा मा.श्री. शैलेंद्र तेलंग, मा.श्री. मारोती जीवतोडे, व मा. कु. लता मडावी यांना भेट वस्तू प्रदान करून शुभेच्छा देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन श्री.स्वतंत्रकुमार कृष्णादत्त शुक्ला यांनी तर आभारप्रदर्शन श्री. संजय डोये यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here