अती वृष्टी मुळे अंगावर घर कोसळून मृत्यु राम कातकरी याचा मृत्यू

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 12जुलै जांभूळ पाडा कातकरी वाडी, उरण, जिल्हा रायगड येथील उन
राम कातकरी याचा अती वृष्टी मुळे अंगावर घर कोसळून मृत्यु झाला आहे. आणि त्याच्या बायकोला हाता पायाला दुखापत झाल्याचे तेथील कातकरी समाजाच्या आशा वर्कर सुशीला नाईक यांनी माहिती दिली.तहसीलदार आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाले आहेत.

आशा वर्कर सुशीला नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11/7/2022 रोजी उरण तालुक्यात जोरात, मुसळधार पाऊस पडत होता. वादळवाराही जोरात सुरु होता. त्यातच रात्री 2 वाजता आदिवासी वाडीतील घर कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाला आहे.4 मुले, आई वडील व नवरा बायको असा त्यांचा कुटुंब आहे.तरी पीडित कुटुंबाला शासकीय मदत निधी मिळावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here