खिर्डी येथे गोठ्याला लागली आग*. . . 

लोकदर्शन 👉 मोहन भारती


—————————————–
⭕स्पिन्कलर पाईप व शिवार जळून खाक , एक लाखाचे नुकसान
——————————————–

गडचांदूर :
कोरपणा तालुक्यातील खिर्डी येथील शेतकरी राजेंद्र मालेकर यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने शेतात असलेल्या स्पिनकलर पाईप , शेतीसाहित्यासह शिवार जळून खाक झाला ..

सदर घटना दुपारच्या सुमारास घडली अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची माहिती तलाठी अन्सारी यांना देण्यात आली असून आगीचा पंचनामा करण्यात येणार आहे

अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यांला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here