विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची एव्‍हरेस्‍ट व आकाशापेक्षाही मोठी – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

OO*पुनर्वसित सिनाळा गावाचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्‍याला प्राधान्‍य*

 

विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांचे स्‍मरण करुन त्‍यांच्‍या स्‍वप्‍नातील न्‍याय, समता, बंधुत्‍वयुक्‍त भारत घडविण्‍याचा आपण संकल्‍प करु या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्‍ट करीत अभ्‍यास, चिंतन, मनन, परिश्रम करुन भारतमातेच्‍या चरणी भारतीय संविधान अर्पण केले व माणसाला प्रतिष्‍ठापुर्ण जीवन जगण्‍याचा अधिकार बहाल केला, त्‍या महामानवाची उंची ऐव्‍हरेस्‍ट व आकाशापेक्षाही मोठी आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले.

दि. 14 एप्रिल 2022 रोज गुरुवारला चंद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित सिनाळा-मसाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करताना आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या प्रसंगी भाजपा नेते रामपाल सिंग, भाजपा चंद्रपूर तालुका अध्‍यक्ष हनुमान काकडे, रोशनी खान, बंडू रायपुरे, विलास टेंभुर्णे, संजय रत्‍नपारखी, अध्‍यक्ष पुनर्वसन समिती गंगाधर वैद्य, उपसरपंच सुरज शेंडे, आशिष बहादुरे, गिता वैद्य, विनाश कातकर, श्रीनिवास जंगम, राकेश गौरकार, श्रीकांत देशमुख आदिंची उपस्थिती होती.

आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्‍या संविधानाने शोषित,पिडीत, वंचितांचा आवाज बुलंद केला. बाबासाहेबांचे स्‍वप्‍न होते प्रत्‍येक नागरिकाच्‍या डोक्‍यावर हक्‍काचे घर असावे. विश्‍वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नागरिकांच्‍या घराचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याचे काम केले आहे. 11 कोटी शेतक-यांना प्रत्‍येक वर्षी 6 हजार रुपये त्‍यांच्‍या खात्‍यात टाकले, 80 कोटी नागरिकांना कोरोना महामारीच्‍या काळात मोफत अन्‍नधान्‍य दिले, एकुण 78 योजनांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांची सेवा केलेली आहे.

आ. मुनगंटीवार पुढे बोलत होते, संविधानातील संसदीय आयुधांचा उपयोग करुन परिवर्तनाचा मार्ग मला रुजु करता आला. हे मी माझे सौभाग्‍य समजतो. लंडन येथील बाबासाहेबांच्‍या निवासस्‍थानाचे स्‍मारकात रुपांतर करताना 40 कोटी रुपयांची तरतुद केली. महामानवाच्‍या 125 व्‍या जयंती निमित्‍त 125 कोटी रुपये पेक्षाही अधीक रक्‍कमेची तरतुद करण्‍याचे भाग्‍य मला लाभले. चंद्रपूरच्‍या पावन दीक्षा भूमीला 2 कोटी रु. खर्चुन डॉ. आंबेडकर भवन उभारण्‍यात आले व नुकतेच 50 लक्ष रु. ए.सी., सौर सिस्‍टीमसाठी मंजुर केले. सिनाळा-मसाळा येथे बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभारता आला. बाबासाहेबांच्‍या विचारांना घेऊन गोरगरिबांची सेवा करता आली, हे मी माझे पुण्‍यसंचित समजतो.

पुनर्वसित सिनाळा-मसाळा गावाचे प्रलंबित प्रश्‍न लवकरच सोडविण्‍यात येतील जिल्‍हा परिषद शाळा, हनुमान मंदिर व या परिसरातील विकासकामे टप्‍या टप्‍याने प्राधान्‍य देऊन सोडविण्‍यात येतील. अमृत महोत्‍सवी वर्षामध्‍ये प्रत्‍येक गरजवंताचा प्रश्‍न सोडविण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात येईल व समाजामध्‍ये अमृत महोत्‍सवी वर्षात अमृतासारखा विचार लोकांपर्यंत पोहचविण्‍यात येईल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *