Home
Home सामाजिक यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना मजूरी वाढी करा. कामगार सेनेचे सहा. कामगार आयुक्तांना...

यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना मजूरी वाढी करा. कामगार सेनेचे सहा. कामगार आयुक्तांना निवेदन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १२/०४/२०२२ :-* सोलापूरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व महिला व पुरुष कामगारांना मजुरी वाढ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले.
मा. सहय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात सुमारे ५० ते ६० हजार कामगार असून यात पुरूष व महिलांचा समावेश आहे. हे कामगार लुम चालविणे, जाबर, मुनिम, डबलिंग, टॉवेल साफ, गाठी मारणे, कोम मशीन चालविणे, वायडिंग, गाठी बांधणे, वॅाचमेन, रिलींग, वारफर, लेसींगवाला, शिलाई कामगार व इतर काम करणारे कामगार असून सर्व कामगारांना गेल्या अनेक वर्षापासुन कुठलेही कायदेशीर लाभ मिळत नाही व किमान वेतनाची ही अंमलबजावणी यंत्रमाग धारकांकडून केली जात नाही. त्यामुळे त्यांना निदान मजुरीत वाढ होणे गरजेचे आहे.
तरी माननीयांनी यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना मजुरी वाढ मिळवून द्यावी. ही विनंती. असे नमुद करण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरूनाथ कोळी, पप्पु शेख, रेखा आडकी, गणेश म्हंता आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here