नगरसेवक हरजितसिंग संधू यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

.
राजुरा :– नगर परिषद राजुराचे माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक हरजितसिंग संधू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामचंद्रराव धोटे प्राथमिक शाळा, रमाबाई नगर, राजुरा येथे ग्लोरीयस फाउंडेशन राजुरा आणि नगरसेवक संधू मित्र परिवार तर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात डॉ. ज्योएल बाबू, डॉ. निस्से जेरूशा, डॉ. सरोजा यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल चेकप, आय चेकप, बल्ड शुगर चेकप, बल्ड प्रेशर अशा रुग्णांना मोफत निदान व सेवा पुरविण्यात आल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्ष अरुण धोटे होते तर प्रमुख अतिथी नगरसेवक हरजितसिंग संधू, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, ग्लोरीयस फाउंडेशनचे सुरेश लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here