कोरपना नगरपंचायत वर कुणाचा झेंडा फडकणार ? काँग्रेस व आघाडी करीत आहे दावा कोरपना..

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

कोरपना ÷ कोरपना नगरपंचायत च्या राजकीय मैदानात विरोधक व काँग्रेस यांच्यात चांगलाच सामना रंगला‌ ,निवडणूक प्रचारात काँग्रेस व परीवर्तन आघाडीने चांगलीच रंगत आणली होती, दोघानी 14 ,,,14 जागेवर आपली पकड दाखवली ,काँग्रेस चे नेते व कार्यकर्ते आम्ही 14जागा जिकू असा दावा करीत आहेत तर परीवर्तन पॅनल सुद्धा 14 जागा जिंकणार असा दावा करीत आहेत जो तो आपल्या पक्षाकडुन बोलताना दिसत आहेत, सध्या पानटपरी ,चौकात,रस्त्यावर बेरीज वजाबाकी करताना दिसतात,कोरपना नगरपंचायत ची निवडणुक प्रथमच यावेळी अटीतटीची झाली असल्याने सर्वांचे गणित बिघडू शकते,. कोणीच असं ठामपणे सांगू शकत नाही की आमचा विजय पक्का आहे, 19 तारखे पर्यत वाट पाहावी लागणार आहे . सत्ताधाऱ्यांचा व विरोधकांचा कोरपना शहरात दोघांचा दबदबा दिसत होता.
या वेळी विरोधकांची मुठ बदलली त्या मुळे काँग्रेसला हि निवडणूक सोपी नाही अशी चर्चा सूरू आहे, प्रत्येक वार्डामध्ये उमेदवारांमध्ये काटयाची ‌ चुरस दिसत होती. आता ,18 जानेवारी ला मतदान होत असलेल्या ‌ वार्ड 1.,2.,17. कडे लक्ष वेधून घेत आहे,उमेदवारांच्या शोधात राजकिय नेते सक्रिय झालेले दिसत आहे,
एकंदरीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहेत, हे मात्र निश्चित,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here