महात्मा गांधी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे अध्यक्ष स्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे,व हनुमान मस्की उपस्थित होते या प्रसंगी भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,वाचन प्रेरणा दिन निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती ,तसेच चित्रकला स्पर्धा, हिंदी दिवस निमित्ताने घेण्यात आली होती, विजेत्या स्पर्धकांना यावेळीं अतिथीच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संचालन प्रशांत धाबेकर यांनी केले तर आभार चेतना कामडी यांनी मानले कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here