ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. १७ डिसेंबर रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा या अनुषंगाने ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने बुधवार दि २० डिसेंबर २०२३ रोजी ओएनजीसी मेन गेट, द्रोणागिरी भवन उरण येथे सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात मुंबई व नवी मुंबई मधील नामांकित रुग्णालय मधील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमास सुबोजित बोस कार्यकारी निदेशक संयंत्र व्यवस्थापक उरण, एम.सी. गौतम महाव्यवस्थापक – आधारभूत सेवा, श्रीमती भावना आठवले महाव्यवस्थापक प्रभारी मानव संसाधन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन देशकार्याला हातभार लावावा. रक्त दात्यांनी रक्तदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र (आधारकार्ड, पैनकार्ड, मतदान कार्ड, काम करीत असलेल्या कंपनीचे ओळखपत्र) सोबत आणावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी, रक्तदात्यांनी ओएनजीसी उरण प्लांटचे अध्यक्ष प्रकाश दळवी, उपाध्यक्ष पराग कदम, कार्याध्यक्ष संदिप गावडे, सरचिटणीस प्रदिप मयेकर, उपाध्यक्ष मनोहर थळी -9969227950, सचिव-बाळकृष्ण काशिद – 9969227951 /8169931575,
सचिव उज्जेश तुपे – 8291281697, 9764165427 यांच्याशी संपर्क साधावे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *