इन्फंट काॅन्व्हेंट येथे पालक- शिक्षक सभेचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दुसरी पालक- शिक्षक सभा पार पडली.
या प्रसंगी पालक- शिक्षक सभेचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, सभेचे उपाध्यक्ष बादल बेले, सहसचिव शैलेंद्र तेलंग व मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच सभेचे सचिव संतोष सागर, धरती नक्षीने उपस्थित होत्या.
या सभेची सुरुवात मागील सभेच्या इतिवृत्त वाचून मजहर शेख यांनी केली आणि शाळेकडून पार पडलेल्या उपक्रमाबाबत व पुढे होणाऱ्या उपक्रमाबाबत ची माहिती मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू दिली. या सभेला उपस्थित झालेल्या पालकांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ममता पुरटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *