महात्मा गांधी सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पंचप्रण शपथ

 

लोकदर्शन :  प्रा. गजानन राऊत

गडचांदूर :

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास अनुसरून पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या मेरी माती मेरा देश या संकल्पनेवर आधारित होता पंचप्रण शपथ घेण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व पंचप्रण शपथ घेण्यामागची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी पंचप्रण शपथीचे वाचन करत उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना पंचप्राण शपथ दिली सदर शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप घोडिले यांनी विशेष प्रयत्न केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *