तंत्रस्नेही शिक्षकाचा मतदार जनजागृतीकरिता स्तुत्य उपक्रम

by : Ajay Gayakwad

वाशिम : श्री शिवाजी विद्यालय,वाशिम येथील उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी ‘माझी शाळा – माझे उपक्रम’ या उपक्रमांतर्गत ‘अभिरूप मतदान’ शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीतून विद्यार्थ्यांना मतदान प्रकियेची निवडणूक आयोगाची रचना व कार्यपद्धती समजावून दिली
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक क्षेत्रांचा विकास साध्य करण्यासाठी व अभिरुची व अभिवृत्ती वाढीसाठी वर्ग व शाळास्तरावर तसेच शालेय परिसरातील विविध उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे असते. वर्गातील व वर्गाबाहेरील अभ्यासविषयक व सहशालेय उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग मिळवता येईलया साठी हा अभिनव उपक्रम उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी राबवला.
मुलांना शाळेची गोडी निर्माण करणे,पट संख्या टिकून ठेवने व वाढ करणे,निवडणूक प्रक्रिये बद्दल माती देणे लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीची रचना व कार्यपद्धती समजावून देणे.कृतियुक्त अध्यापन करणे लोकप्रतिनिधीची निवड कशी होते ही माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देणे.निवडणूक आयोगाची रचना व कार्यपद्धती समजावून देणे.मतदानाचे महत्व व जनजागृती करणे.
मोबाईल, कंपारमेन्ट चार्ट,(निवडणूक कक्ष म्हणून) हजेरी(मतदार यादी म्हणून) खुर्ची, टेबल,आदी आदी साहित्याच्या माध्यमातून
चार दिवस कालावधी मध्ये राबविला उपक्रम
दिवस पहिला : निवडणूकाची कार्यक्रम आचारसंहिता सांगणे व स्वरूप सांगणे
दिवस दुसरा : उमेदवारी अर्ज स्वीकारने
दिवस तिसरा : अर्ज मागे घेणे व प्रचार करणे
दिवस चवथा : प्रत्यक्ष निवडणूक घेणे निकाल जाहीर करणे

श्री शिवाजी विद्यालय,वाशिम येथील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक शरद दत्तराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,आपण आपल्या शाळेची Voting Machine या मोबाईलअँप द्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणार आहोत.या साठी इयत्ता ८ वी ते १० वी या वर्गतून आपणास शाळेसाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, स्वछतामंत्री, सांस्कृतिक कार्यक्रममंत्री व क्रीडा मंत्री यांची निवड करावयाची आहे. निवडणूक कार्यक्रम पत्रिका बाहेरच्या नोटीसबोर्डवर लावण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणे कार्यवाही सुरू केली.एकून १५ लोकांनी उमेदवारी अर्ज भरला दुसऱ्या दिवशी ०४ लोकांनी निवडणूकीतून माघार घेतली.राहिलेल्या ११ लोकांनी प्रचाराचा नारळ अर्पण केला.आणि प्रचारास सुरुवात केली. शाळेतील प्रत्येक ०८ ते १० च्या मुलांना निवडणूकित उभे असणारे उमेदवार मलाच मतदान करा असे सांगत होते आणि वर्ग,शाळा,घर,गली,आदी ठिकाणी मतदार विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेत होते अखेर तो दिवस उजाडला निवडणूक निरीक्षक म्हणून प्राचार्य / मुख्याध्यापक माननीय श्री अरुणभाऊ सरनाईकसर निवडणूक निर्णय अधिकारी उपमुख्याध्यापक श्री चंद्रकांत शिंदेसर पर्यवेक्षक श्री एकनाथ मिसरसर हे होते.निवडणूक कक्षात पूर्ण तयारी करून घेण्याचे कार्य व निवडणूक अधिकारी, प्रतिनिधी नेमणूक, निवडणूक कक्षातील EVM मशीनकडे लक्ष ठेवणे तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक व या कार्यक्रमाचे आयोजक शरद दत्तराव देशमुख यांनी स्वीकारली.मतदारांना रांगेत उभे करणे व मतदानासाठी पाठवणे हे कार्य विद्यार्थ्यावर सोपविण्यात आले या निवडणुकीत एकून ५० मतदार होते त्यापेकी ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची वेळ संपल्यावर निकाल जाहीर करण्यात आला.या निवडणूकित मुख्यमंत्री स्वस्कृतिक मंत्री क्रिडा मंत्री स्वच्छता मंत्री आरोग्य मंत्री अशी पदे मिळाली बाकी ६ लोकांचा पराभव झाला या नवनियुक्त मंत्री मंडळाचे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माननीय सौ अनिताताई किरणरावभाऊ सरनाईक यांच्या हस्ते आकर्षक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *