सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट : एकास अटक

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील एका माथेफिरू युवकाने मोबाईल स्टेटस वर एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जऊळका पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक केली आहे. जऊळका रेल्वे येथील संजय व्यास वय (19 वर्ष,) याने पोलिसात फिर्याद दिली की, दिनांक 20फेब्रुवारी 2023 रोजी गावामध्ये चंद्रेश्वर महादेवाचे भागवत सप्ताह समाप्ती कार्यक्रमा निमीत्त गावामध्ये महादेवाची पालखी व त्यांनतर नगरभोजनाचे गावक-यांनी आयोजन केले होते. महादेवाची पालखी सकाळी 11.00 वाजता दरम्यान गावात प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली होती. पालखी गावातुन फिरून राममंदीरा जवळ आली असता गावातील काही विशिष्ट समाजाचे मुलानी त्यांची मोटार सायकल पालखीच्या मधात घातली त्यावरून दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होवुन भांडण झाले होते. त्यावरून पोलीस स्टेशन जउळका येथे एकामेका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यानंतर आज दिनांक 21फेब्रुवारी2023 रोजी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास मि गावातील संतोष लढ्ढा याचे घरा समोर उभा राहुन मोबाईल पाहत असतांना मला मोबाईल क्रमांक 8767008218 या मोबाईल क्रमांकाचे व्हॉट्सअप स्टेटस दिसून आले ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे समोर झेंडा फडकविताना ” किसकी मा जनी जो हमको डराये कोण माँ का जणा है डराने वाला आजाये हम भी देखे ” असा व्हिडीओ त्याचे स्टेटसला ठेवुन त्यामध्ये इग्रजी अक्षरात ” jaulka rly Muslim power ” असे लिहलेला व त्यापुढे दोन दंडाचे निशान असे ठेवलेले होते. त्यामुळे मी गावातील शाम लढवा, शंकर ढवळे, राजु देशमाने, गजानन राउत यांना दाखविले त्यामुळे आमचे सर्वांच्या धार्मीक भावना दुखावल्या अशी फिर्याद जऊळका पोलिसात दिली सदर तक्रार दाखल होताच जऊळका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन गावातीलच एका विशिष्ट समाजाच्या माथेफिरू युवकाला तात्काळ अटक करून त्याचे विरुद्ध भा द वी कलम 295 A नुसार गुन्हा दाखल केला आहे जऊळका येथे मागील दोन दिवसांत समाज विघातक दोन घटना घडल्याने सध्या स्थितीत गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शना खाली जऊळकाचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे व बीट जमदार सुनील काळदाते हे करीत आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *