व्हाईस ऑफ मीडियाच्या वाशिम शहर संघटकपदी सुरज अवचार

by : Ajay Gayakwad

वाशीम :- तमाम पत्रकाराचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वाशिम शहर संघटक पदी युवा पत्रकार सुरज अवचार यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक हाॅटेल इव्हेंन्टो येथे ३ एप्रिल रोजी आयोजित व्हाईस ऑफ मीडियाच्या कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळ्यानिमित्त पार पडलेल्या बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार आणि पत्रकारितेच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना असून २१ राज्यांत ही संघटना कार्यरत आहे. पत्रकारांची कल्याणकारी संघटना म्हणून ही संघटना देशात कार्यरत असून कोणतेही राजकारण न करता केवळ पत्रकारीता आणी पत्रकारांना सक्षम करण्याचे काम ही संघटना करीत आहे . पत्रकारांना त्यांची स्वताःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे . या संघटनेच्या वाशिम शहर संघटक पदी युवा पत्रकार सुरज अवचार यांची नियुक्ती करण्यात आली आहे . यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के, दिव्या पाटील भोसले राष्ट्रीय कार्यालयीन सचिव व्हाईस ऑफ मीडिया, मा,दिव्या देशमुख , जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, जिल्हाध्यक्ष वाशिम शहर दिलीप अवगण, प्रदेशाध्यक्ष सा, विंग. व्हाईस ऑफ मीडिया विनोद बोरे, यांच्या हस्ते युवा पत्रकार सुरज अवचार यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकार व व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *