जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले मालेगाव

by : Ajay Gayakwad

वाशिम/ मालेगाव

: मालेगांव येथील दिगंबर जैन मंदिर येथील जन्म कल्याण जयंती महोत्सव शांततेत पार ज्ञान,दर्शन,चारित्र्य, अहिंसा,शांती,जगा आणि जगू द्या,अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव 4 एप्रील मंगळवारी मालेगांव येथे शांततेत पार पडला मालेगांव परिसरातील सकल जैन समाजाच्या बंधू भगिनींनी स्थानिक मुख्य मार्गावरील जैन मंदिरापासून सकाळी ६ वाजता पायदळ प्रभात फेरी करून भगवान महावीरांचा शांततेचा संदेश देणारी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व समाजाच्या बंधूभगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व पांडे वेताळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष अरुण बळी,बबन चोपडे,व परमेश्वर सावंत यांनी फोटोला हार घालुन पुजा केली तसेच संदीप अशोक सावले यांच्याकडून नाश्ता व जितेंद्र देशभूषण टीकायत यांच्याकडून शरबत तसेच कुणाल उल्हास कान्हेड, यांच्याकडून थंड पेय व कुल्फी वाटप करण्यात आले आहे मेडिकल चौक येथे भाजप नेते डॉक्टर विवेक माने,व संतोष घुगे,संदीप केकन,विनोद बानाईतकर,यांनी सुद्धा भगवान महावीराच्या फोटोला हार घालून पूजा केली मिरवणुकी दरम्यान परिधान केलेल्या लहान मुला-मुलींनी आकर्षक देखावे साकारले होते या उपक्रमास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भगवान महावीरांचा संदेश देणारी मिरवणूक जैन मंदीर पासुन खवले वेटाळ,पांडे वेटाळ,शिवचौक,गांधी चौक, मेडीकल लाईन,ते बसस्टॉप पोलीस स्टेशन सोमोरून, जोगदंड हॉस्पीटल, दुर्गा चौक ते जैन मंदीर मार्गावरील पोहोचली या मिरवणुकीदरम्यान दिगंबरी जैन समाजातर्फे थंडपाणी व कुणाल कान्हेड यांच्या कढुन शरबतची व्यवस्था करण्यात आली होती मिरवणूक जैन मंदिरात आल्यानंतर तिथे आयोजित कार्यक्रमात भगवान महावीरांची आरती करण्यात व तसेच महाप्रसाद सहभोजनाचा कार्यक्रम सकल जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आला भगवान १००८ श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव
दि.३/४/२०२३ सोमवार भ.महावीर जन्म सकाळी ६.३० नंतर अभिषेक पुजन
दि.४/४/२०२३ मंगळवार
सकाळी – ५.३० ला प्रभात फेरी पायदळ काढण्यात आली त्यानंतर सकाळी ६.३० अभिषेक,पुजन ८.३० शोभायात्रा (मिरवणूक)
रात्री – ७.०० सांस्कृतिक कार्यक्रम (लहान मुलांचे) सांस्कृतीक नाटीका कार्यक्रम घेन्यात आले,तसेच आजुबाजुच्या खेडेगाव येथील सकल जैन समाजाच्या बांधवांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *