वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर त्रस्त

by : Ajay Gayakwad

वाशिम/मालेगाव : मालेगाव शहरातील नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. ही समस्या काही सुटता सुटत नसल्याने येथील नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.  शहरातील मेन रोडने अधिक वाहतुक असल्याने रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण, फेरीवाल्यांनी रस्त्यातच मांडलेली दुकाने,रस्त्यातील हातागाडयांचा उच्छाद व रस्त्यातच पार्किंग केलेली वाहने यामुळे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी व वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही नगरपंचायत प्रशासन यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.शहरात सकाळी ११ ते १२ व दुपारी ५ ते ५:३० शाळा सुटण्याच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ना.ना.मुंदडा विद्यालय,अकोला फाटा ते जोगदंड हॉस्पीटल,गांधी चौक,शिव चौक,आठवडी बाजार,मेडीकल चौक,व तसेच पोलीस स्टेशन ते स्टेट बँक,या समोरील खुप मोठया प्रमानात अॅटो,मोटरसायकल,आदी प्रायवेट गाड्या उभ्या राहतात,या ठिकाणी यावेळी रस्त्यावर वेडीवाकडी उभी राहणारी वाहने,रिक्षांची नाक्यांनाक्यावर गर्दी व हातगाडी,फेरीवाल्यांचे बस्तान आदी कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. नगरपंचायत प्रशासन वाहतूक पोलिसांवर ढकलत हे काम त्यांचे असल्याचे सांगते वाहतूक पोलीस नगरपंचायत प्रशासनानेही यामध्ये जातीने लक्ष घालत नसल्याची खंत व्यक्त केली तरी दोन्ही विभागाने यात लक्ष घालून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नगरपंचायतची स्वतःची पार्किंगची सोय नाही त्यामुळेच वाहने कुठे उभी करावयाची असा सवाल वाहनचालक करीत आहेत यासाठी नगरपंचायतने प्रथम वाहन पार्किंगची सोय करावी. त्यानंतरच काहीअंशी तरी वाहतूक कोंडी कमी होईल असे बोलले जात आहे त्यासाठी नगरपंचायतने पुढाकार घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरातील वाहतूक कोंडीची समस्यां सुटणे कठीण दिसते.

#malegav

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *