



by : Ajay Gayakwad
वाशीम /मालेगाव :
किन्हिराजा : ट्रक व दूचाकीच्या अपघातात भावी नवदेव गंभीर जखमी झ्याल्याची घटना 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता किन्हीराजा येथिल 33 केव्ही वीज उपकेंद्राजवळ घडली.
प्राप्त माहिती नुसार, मान्टो ईन्टरप्राईजेस वर्धा येथिल एम एच 32 ए जे 3673 या क्रमांकाचा ट्रक नागपूर ते औरंगाबाद या महामार्गावरुन जात होता.याचवेळी माळेगांव येथिल रहिवासी सतिष किसन लोखंडे(25)हा आपल्या दुचाकीने या ट्रकला पाटीमागुन व्होअरटेक करत असताना स त्याचे दूचाकीवरील नियंत्रन सुटल्याने तो ट्रकच्या मागिल चाखाखाली आला. ट्रकचे चाक सतिष च्या एका पायावरुन गेल्याने तो गंभिर जखमी झाला.गंभिर जखमिला स्थिनिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे उपचारा करिता पाठविण्यात आले.माञ तो गंभिर जखमी असल्यामुळे त्याला अकोला येथे नेण्यातआल्याची माहीती पोलिस कर्मचार्यांनी दिली. सतिष लोखंडे याचा गणेशपुर येथिल मुलीशी विवाह जुळन त्याचा साखरपुडा काही दिवसापुर्वी झाला लग्नाला अवघे काही दिवस उरले असतांना सतिष चा अपघात झाला आणी या अपघातात त्याच्या पायाला गंभिर मार लागला.