कारंजा येथे महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धा 

By : Ajay Gayakwad

वाशिम

कारंजा : जिजाऊ ब्रिगेड शाखा, कारंजा डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, समतादूत विभाग कारंजा जि वाशिम, उमेद अभियान कारंजा यांच्या संयुक्त विद्यमानाने 3 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्री-जिजाऊ जयंती या दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पंचायत समिती कारंजा येथे उत्सव जिजाऊ- सावित्री जयंतीचा सन्मान,सोहळा स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जिजाऊ सावित्रीच्या वेशभूषा ,गीत गायन ,वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची ,100 मीटर धावणे ,100 मीटर समूह धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये जिजाऊ बिग्रेड सखी व उमेद अभियानातील सर्व स्त्रियांनी अतिशय उत्कृष्ट सहभाग दिला .कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस पी पडघन हे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बार्टी वाशिमचे प्रकल्प अधिकारी ऍड. वसंत गव्हाळे सत्कारमुर्ती जिजाऊ ब्रिगेड कारंजाच्या मार्गदर्शक सौ प्रा .सविताताई मोरे ,उपशिक्षणाधिकारी ,वाशीम व जिजाऊ ब्रिगेड सचिव मंगरूळ सौ सुरेखाताई चौधरी तसेच प्रभागसंघ भामदेवीचे अध्यक्ष उषाताई कडू ,बबिता ठाकरे तसेच प्रभागसंघ काजळेश्वर अध्यक्ष छायाताई तिडके ,जिजाऊ ब्रिगेड कारंजा अध्यक्ष वर्षा ठाकरे तसेच जिजाऊ ब्रिगेड सचिव प्रीती राऊत ह्या उपस्थित होत्या.  गटविकास अधिकारी एस पी पडघन यांनी स्पर्धेकरीता महिलांना शुभेच्छा देत महिला व पुरुष दोघांनीही आपले काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे व महिलांचे महत्त्व समजावून सांगणारे मार्गदर्शन केले. बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी स्त्रियांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून स्वतःला आजच्या जगात सिद्ध करावे व सक्षम करावे याविषयी मार्गदर्शन केले गटविकास अधिकारी पडघन यांनी वेशभूषा या स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात केली. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा भेलांडे, द्वितीय क्रमांक रेखा लांडे, तृतीय क्रमांक वैष्णवी थोटांगे यांनी पटकावला. गीत गायन या स्पर्धेत सुलोचना बोंदरे प्रथम क्रमांक ,नंदा आढाव द्वितीय क्रमांक तर ज्योती गुळदे तृतीय क्रमांक पटकावला. वकृत्व स्पर्धेत सुषमा चव्हाण प्रथम क्रमांक तर मनीषा नगराळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. धावण्याच्या स्पर्धेत वैष्णवी थोटांगे प्रथम क्रमांक,  पूजा राठोड द्वितीय क्रमांक तर रजिया नंदावाले तृतीय क्रमांक पटकावला.संगीत खुर्ची या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती शेजव द्वितीय क्रमांक विना धाये आहे तर तृतीय क्रमांक सुषमा चव्हाण ,समुह धावणे या स्पर्धेत चंचल इंगोले बबीता फुलमाळी उषा कडू रेखा सरोटे मनीषा नगराळे नंदा मनवर या समुहाने प्रथम क्रमांक तर प्रतिभा भेलांडे भारती हेगडे यांच्या समूहाने द्वितीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना गटविकास अधिकारी पडघन सविता मोरे तसेच जिजाऊ प्रतीक्षा सर्व सदस्यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले ,स्पर्धा परिक्षक हर्षा बागडे ,वर्षा गोळे,निशा खुमकर ,अपर्णा जाधव ,संगिता राजगरू यांनी परिक्षण केले, कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड कारंजाच्या निशा खुमकर, विजया दहातोंडे, छाया गावंडे ,प्रमिला अंबाळकर ,सुचिता बाजारे ,नीता खाडे, वर्षा ठाकरे, प्रणिता दसरे संगीता राजगुरू ,सपना नाचोने आरती अघम ,सुप्रिया कदम विमल आवटे ,सरिता कडू ,प्रीती पिंजरकर, सविता मोरे ,हर्षा बागडे ,वर्षा गोळे, मंजुषा पिंपळशेंडे , प्रिती राऊत ,अपर्णा जाधव ,ज्योती मेहकर,शितल कानडे, पंचायत समिती ऊके बाई बार्टीचे मालेगाव समता दूत रमेश बुरकुले तसेच उमेद अभियानाच्या मनीषा लवटे निशा बोरकर ,चंद्रकांत थोटे ग्रामीण भागातील सर्व सीआरपी कृषी सखी व उमेद अभियानातील सर्व काही स्वयंसहायता समूहातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ठाकरे , सूत्रसंचालन बार्टी समतादूत प्रणितादसरे,क्रिडास्पर्धेचे संचालन वर्षाताई गोळे कारंजा यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा बागडे यांनी केले, असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *