आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– जिल्हा परिषद, चंद्रपूर व तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर वार्ड क्र. १७ येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक २ चे उद्घाटन सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. हे आरोग्य वर्धिनी केंद्र स्थानिक नागरिकांसाठी मदतगार आणि उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संबधित स्टाफने इंदिरा नगरवाशीयांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आव्हान केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ उ बा स सभापती विकास देवडकर, तहसीलदार ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगरदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. अनिता अरके, डॉ. सोनकुसरे, डॉ. नळे, डॉ. त्यागी, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, संध्या चांदेकर, भारत रोहने, रवी त्रिशूलवार, यु काँ. अध्यक्ष रामेश्वर ढवस, निरंजन मंडल, राहुल बंडावार यासह उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील सर्व डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *