अबब..हे काय.? चौकाचौकात महिला पोलीस..! एकीकडे दारू दुकानात वाढ तर दुसरीकडे महिला संरक्षणासाठी पोलीसांची मागणी…!

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
गडचांदूर:-@
गडचांदूर शहर हे कोरपना तालुक्यातील नावाजलेले औद्योगिक शहर असून सध्या परिस्थितीत येथील लोकसंख्या अंदाजे 45 हजाराच्या जवळपास आहे.याठिकाणी मोठी बाजारपेठ असून दर आठवड्याला मोठा बाजार भरतो. उत्पन्न बाजार समिती,राष्ट्रीयकृत व प्रायव्हेट बँका,शाळा,महाविद्यालय या शहरात आहे.असे असताना येथे शिक्षणाचे धडे गीरविण्यासाठी परिसरातील गाव खेड्यातून मोठ्याप्रमाणात मुले,मुली व ग्रामीण भागातील लोक रोज विवीध कामानिमित्त येतात.विशेषत: आठवडी बाजाराच्या दिवशी तर तोबा गर्दी पहायला मिळते.यामध्ये महिलांचा समावेश उल्लेखनीय असतो.काही रोडरोमियोंची टोळी बसस्थानक व शाळा,महाविद्यालयाच्या मार्गाने उभे राहून टवाळक्या करतात.जर अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तर महिला,मुलींना होणारा मनस्ताप दूर होईल.या उदात्त हेतूने जबाबदार अशी शहराची प्रथम महिला म्हणून जर नगरपरिषद नगराध्यक्षांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले तर ही बाब कौतुकास्पदच म्हणावी लागेल,यात दुमत नाही.16 मार्च रोजी नगराध्यक्षांनी नगरपरिषदेच्या काही महिला नगरसेविकांसह ठाणेदाराला निवेदन देऊन शहरात त्या ठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केल्याचे कळते.
असे असताना मात्र सोशल मीडिया व शहरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.काहींनी याचे तोंडभरून कौतुक केले तर काही यावर नानाप्रकारचे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे.”एकीकडे इतर ठिकाणांच्या स्थलांतरित दारू दुकानांना एकामागे एक नगरपरिषदेकडून ना-हरकत देऊन शहराचे वातावरण दूषित करायचं आणि दुसरीकडे महिलांना त्रास होणार नाही म्हणून महिला पोलिसांची मागणी करायची” ही बाब कितपत योग्य.? अशी प्रश्नयुक्त चर्चा जनतेतून सध्या ऐकायला मिळत आहे.सांगायचं झालं तर गडचांदूर शहरात सध्या दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे.यावर पुन्हा इतर ठिकाणच्या स्थलांतरित नवीन दारू दुकानाला ना-हरकत देण्याकडे नगरपरिषदेचे लक्ष आहे.सध्या येथे 8 प्रभाग असून विदेशी वगळता,देशी दारूच्या 5 दुकाने आहे.
यापूर्वी हिच मागणी 28 डिसेंबर 2022 रोजी माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी केली होती.”कोरपणा Live” वर यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यात आली होती.परंतू अजूनही पोलीस प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसत नाही.आता परत तीच मागणी नगराध्यक्षांनी केली असून कौतुकाचा वर्षाव होत आहे मात्र सदरची मागणी करने व शहरात दारूच्या दुकानांना मोकळे रान उपलब्ध करून देणे,हे कितपत योग्य ? अशी चर्चा सुरू आहे.माजी नगराध्यक्षा नंतर आता विद्यमान नगराध्यक्षांनी सुद्धा तीच मागणी केली आहे.असल्याने पोलीस विभाग याकडे कसे बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *