पत्रकार उत्कर्ष समितीचा दिपावली बहुजन मेळावा…!

लोकदर्शन प्रति. -👉(राजेंद्र लकेश्री मुंबई – – कामाठीपुरा)पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबई

पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबई शाखेच्या वतीने दिपावली निमित्त कामाठीपुरा विभागातील श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात बहुजन समाजातील लोकांचा एक आनंद मेळावा पत्रकार समितीच्या महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. प्रास्ताविक भाषण मुंबई समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक श्री. राजेंद्र लकेश्री यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली, कार्यक्रमातील उपस्थित पाहूण्यांची ओळख श्री. आनंद मुसळे यांनी करून दिली, या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीच्या सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी सन्माननीय पाहुणे अँड. दिपरत्नाकर सावंत, अँड. मंदार चिखले, निवृत पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, पवार साहेब, डॉ. शैलेश ठाकूर, शिवसेनेचे सुनील कदम, शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. सुरेश शेट्टी, संतोष बंदरे, माजी नगरसेवक श्री.शाकिर अन्सारी इत्यादि मान्यवरांच्या हस्ते बहुजन समाजातील ज्येष्ठ नागरिक सूर्यलाड हिन्दू खाटीक समाजाचे अध्यक्ष. श्री. दाशू साबूनकर, बाबूराव वानखरे, मराठा समाजाचे श्री. बाबी तळेकर, अशोक परब, तेलगू पेरका समाजाचे लिंगम गोरला, सत्यनारायण आसम शेट्टी, मारुती कूंचाल, तेलगू माला-मादिगा समाजाचे टेडू बाबू, गंगाधर पोता, तेलगू मुदीराज समाजाचे बाभना गुंडा वलू वयना, तेलगू पद्मशाली. समाजाचे देवण्णा कोंडी,राजू गुज्जा, राजेश्वर जोगू, रमेश कोट्टा, श्रीहरी गोसीकोंडा, वाघरी समाजाचे श्री रमेश परमार, मुस्लीम समाजाचे कादीर भाई, सहा मोहम्मद, श्रीमती आफा, वैश्य वाणी समाजाचे श्री रघुनाथ शेरे, सुभाष साडविलकर, दत्ता वंजारी, अनिल जठार, संदीप तानवडे, रघुनाथ पाटणकर, तर साहित्यीक,कवि, पत्रकार, सिनेनाटय कलावंत म्हणून सर्वश्री महेश्वर तेंटाबे, बबन जोशी, अमर पारखे, प्रकाश बाडकर, शिवदास शिरोडकर, मिलींद आरोळकर, व खंडू माळवे इत्यादी मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला दिवाळी फराळाने कार्यक्रमाचा शेवट गोड झाला.

आपला नम्र
(श्री. राजेंद्र लकेश्री)
अध्यक्ष
पत्रकार उत्कर्ष समिती,मुंबई
मो.नं. ९८१९३६३४३४

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *