झरपट नदी व शहरातील नाल्यांची सफाई तातडीने करा

by : Priyanka Punvatkar

* पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

चंद्रपूर,दि.२१ : अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील झरपट नदी आणि शहरा लगत असलेले मोठे नाले तसेच नाल्यांची साफसफाई तातडीने करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर अनेक घरांचे नुकसानही झाले. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. तसेच पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्ण नियोजन करा, असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. याच धरतीवर चंद्रपूर शहरातील नियोजनाच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

‘चंद्रपूर शहरात १८ जुलैला २४० चंद्रपूर शहरात १८ जुलैला २४० मिली पाऊस पडला. त्यामुळे शहर जलमय झाले होते. शहरात जागोजागी पाणी साचल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला तसंच घरात पाणी शिरले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *