उरणच्या समस्या विषयी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट. ♦️समस्या सोडविण्याचे मनसेच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकारी यांचे आश्वासन.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 7 जुलै उरण शहरातील विविध नागरिकांनी उरण शहरातील समस्या विषयी मनसेच्या पदाधिकाऱ्यांजवळ तक्रार बोलून दाखवली होती. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेउन विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून संदेश भाई ठाकुर – रायगड-जिल्हा अध्यक्ष मनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय भोरे उरण शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उरण शहरातील मधील विविध समस्या विषयी निवेदन देण्यात आले.व उरण शहरातील विविध समस्या त्वरित सोडविण्याची मागणी मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. उरण शहरातील उरण – मोरा रोड रस्त्या मधील लाईटचे पोल व त्या रस्त्या लागत असलेले गटारे यांचे लवकरात लवकर काम करण्यात यावे.उरण शहरातील काही ठिकाणी (बोरी, कुंभारवाडा,मोरा रोड) राहिलेली (गटारे) नालेसफाई करण्यात यावेत.उरण शरहातील विमला तलाव शुशोभीकरण व तळ्यातील गाळ काढण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्ना बाबत व गटारे यांच्या मधील असलेली पाण्याची लाईन स्थलांतरीत करण्यात यावेत असे विविध मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आले.उरण शहर सचिव दिनेश हळदणकर, महिला उपतालुकाअध्यक्ष – कविता म्हात्रे, उरण शहर संघटक -गणेश तांडेल,उरण शहर उपाध्यक्ष -उमेश वैवडे,उरण शहर उपाध्यक्ष-हितेश साळुंखे, उरण शहर अध्यक्ष (म.न. वि.से) – प्रतिक अमृते, विभाग अध्यक्ष – दत्ता पाटील, सुरेश अय्यर (अण्णा), राजेश सरफरे, व ओम शेरे आदी मनसेचे पदाधिकारी, मनसैनिक यावेळी उपस्थित होते.मनसेच्या निवेदनाची व मागणीची दखल घेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सदर समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *