बदलापूरमधील तडफदार समाजसेवक श्री राजेंद्र हरिश्चंद्र नरसाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश* _*♦️बदलापूर शहर संघटक पदी नियुक्ती.*_

 

लोकदर्शन बदलापूर 👉गुरुनाथ तिरपणकर

बदलापूर दि. १८ ऑगस्ट २०२३

बदलापूर पश्चिम येथील गायत्री संकुल येथे राहणारे समाजसेवक श्री राजेंद्र नरसाळे यांनी आज बदलापूर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. कॅप्टन आशिष दामले यांच्या कार्यकारिणीमध्ये शहर संघटक हे महत्वाचे पद देऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. श्री राजेंद्र नरसाळे हे बदलापूरमधील विविध सामाजिक संस्थांचे पदसिद्ध सदस्य व पदाधिकारी असून आजवर विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. रेल्वे प्रवासी समस्या, तसेच शहरातील विविध सामाजिक समस्यांमध्ये ते नेहमी पुढाकार घेऊन समस्या सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात अशी त्यांची ख्याती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेल ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष डॉ अमितकुमार गोईलकर यांनी याकामी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश आणि पदनियुक्ती सोहळा पार पाडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदलापूर शहर महिला अध्यक्ष सौ प्राचि थिटे, शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले व डॉ अमितकुमार गोईलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी श्री शिवाजी कराळे, श्री दिनेश धुमाळ, सौ. सोनल मराडे, सौ. छाया आदमाणे, सौ. नमिता कांबळे, सौ. निता पेंडुलकर, सौ. काजल रसाळ, निवृत्त पोलीस अधिकारी श्री दिलीप शिरसाठ, श्री कपिल कांबळे, महिला शहर अध्यक्षा सौ प्राची थिटे, शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, डॉ. सेल जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अमितकुमार गोईलकर आणि इतर महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री राजेंद्र नरसाळे यांना सर्वांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *