Home
Home Breaking News इन्फंट कॉन्व्हेंट येथे इंग्रजी भाषा दिवस संपन्न.

इन्फंट कॉन्व्हेंट येथे इंग्रजी भाषा दिवस संपन्न.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे ‘इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रफिक अंसारी, उमेश लढी, संतोष सागर, नसीम शेख मंचावर उपस्थित होते.
यानिमित्ताने विदयार्थ्यासाठी वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. क्रांती लिहीतकर हिने विल्यम शेक्सपिअर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन इंग्रजी विषय शिक्षक दिपक खाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here