बांबू पूरवठा करण्यास टाळाटाळ करणा-या व शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणा-या वन अधिका-यावर कायदेशीर कारवाई करा,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,, ,संतोष पटकोटवार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना कोठारी, तोहोगाव, गडचांदूर, पोंभुरणा या ठिकाणी बूरूड समाज अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून हिरव्या बांबू पासुन विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा हा त्यांचा पिढीजात व्यवसाय असल्याने हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना दररोज हिरव्या बांबूची गरज पडते, हा व्यवसाय करून बूरूड समाजाला ऊतम रितीने व ऊंच मानाने जिवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रती कुटुंब धारकांना वार्षिक एक हजार पाचशे नग* *हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय असताना गेल्या दोन वर्षांपासून मा, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग कार्यालय चंद्रपूर व मा, वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांना अनेक वेळा पत्रा द्वारे बांबुची मागणी केली परंतु पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली, या वन अधिका-या निष्काळजीपणामुळे बूरूड समाजातील कामगारांना गरिबीची झळ सहन करावी लागत असून उपासमारीची पाळी आली आहे, बांबू पुरवठा अभावी बूरूड कामगारांना नाईलाजाने चोरीछुपे जंगलातील बांबू अवैध मार्गाने* *आणावे लागत आहे व उन्हातान्हात आपल्या जीवाचे रान करावे लागत आहे, या वन अधिक-याचया हयगयपणामुळे दररोज हजारो बांबू ची अवैध कटाई होत आहे व शासनाचा लाखो रुपये* महसूल बूडत आहे, *यात शासनाचे खुप मोठे नुकसान होत आहे बूरूड कामगारांना वेळेवर निस्तार बांबू पुरवठा न करणाऱ्या व शासन निर्णयाला धुडकावून लावणा-या वन अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी* अशी *मागणी करणारे लेखी निवेदन शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य, संतोष पटकोटवार यांनी जिल्हा अधिकारी, चंद्रपूर मा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूख्य वनसंरक्षक वृत चंद्रपूर, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर,माजी आमदार वामनराव चटप राजूरा यांना पाठीवले आहे,*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *