



लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत धोंडाअर्जुनी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या ३० कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत काँगेस पक्षात प्रवेश केला. यात गोंडवाना गणतंत्र पार्टी चे नेते *नामदेराव पा जुमनाके* *गोविंदराव ठोंबरे* *धोंडाअर्जुनी चे सरपंच रंजनाताई जुमनाके* सदस्य भीमबाई कोवे, जनाबाई कोटनाके, गीता कुलमेथे, अक्षता पवार, गंगा चव्हाण, पुडियाल मोहदा येथील भगवान गीते, हरिश्चंद्र जाधव मारुती गुट्टे, रवी डफरे, नागपूर येथील संजय पवार, साहेबराव पवार, उल्हास राठोड, गाजुबाई पवार, पंचफुला पवार, बलीराम पवार, प्रयाग पवार, गायत्री पवार, दयाराम पवार, सुभाष जाधव, कमलाबाई पवार, जनाबाई पवार यासह ३० कार्यकर्त्यांना आमदार सुभाष धोटे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जिवती तालुक्यात आजच्या स्थितीत अनेक रस्त्यांचे कामे पूर्ण झाली आहेत तसेच आपल्या काळातच आदिवासी स्थानिक बांधवांना शेतीचे पट्टे मिळवून दिले आहेत. तालुक्यातील अनेक समस्यांच्या निवाडा आपण करीत आहोत शेंणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिवती येथील ग्रामीण आरोग्य केंद्र, नक्षलग्रस्त अंतर्गत अनेक महत्त्वाचे रस्ते, तालुक्यातील तलावाचे कामे व कृषी विभाग मार्फत बंधारे, अशा अनेक विकासकामे पूर्ण केली असून विकासकामे निरंतर चालू ठेवणार आहे.
या प्रसंगी माजी जि.प. सदस्य भीमराव पा मडावी, जेष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गणपत आडे, नामदेव जुमनाके, सरपंच रंजनाताई जूमनाके, माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, तालुकध्यक्ष महिला नंदाताई मुसने, शहराध्यक्ष तथा नगरसेवका सुनीता वेट्टी, जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर, भाऊजी चव्हाण, उपनगराध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे, दिवाकर वेट्टी, माधव डोईफोडे, सत्तरशहा कोटनाके, भोजु पा आत्राम, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, सरपंच सिताराम मडावी, बंडू राठोड, केशव भालेराव, तिरुपती पोले, राहुल मालेकर, गणेश गोडे, गणेश वाघमारे, नामदेव कोवे, विजय राठोड, उपसरपंच सुधाकर जाधव, सरपंच कमलाबाई राठोड, सुमनबाई शेडकी, सरपंच नयना शिंदे, उपसरपंच निर्मला मदेवाड, मारोती मोरे, रामदास गणवीर, बाळू पतंगे, मारोती बेलाडे, विलास पवार, सुनील शेडकी, समीर पठाण, ताजुद्दीन शेख, सामील शेख, दत्ता गायकवाड, इरफान भाई, सरपंच, उपसरपंच काँगेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.