गडचांदूर येथे बैसाखी पर्व उत्साहात साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️3 दिवस धार्मिक कार्यक्रम चे आयोजन.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर येथे बैसाखी पर्व 12 ते 14 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
12 एप्रिल ला सकाळी 11 वाजता श्री अखंड पाठ साहेब ला सुरुवात झाली 14 एप्रिल पावेतो चाललेल्या अखंड पाठ ची सेवा बाबाजी भगौड साहब, अमरसिंह कागजनगर,स्वर्ण सिंग,गुरुदेव सिंह,राजुरा, व अध्यक्ष जरनेल सिंह, गडचांदूर यांनी केली,
14 एप्रिल ला सकाळी 11 ते 12 पावेतो गुरप्रित सिंह यांनी सुमधुर गुरुवाणी कीर्तन सादर केले,12 ते 1.30 पावेतो बाबाजी अमृतसर यांचे प्रवर्चन झाले,
मंजिंदर सिंग यांनी ओंकार सिंग यांना सिरोपा भेट दिला, तर हंसराज चौधरी यांनी कर्नसिंग भुराणी व करिष्मा कौर यांना सिरोपा भेट दिला,गुरुद्वारा साधं संगत गडचांदूर चे संस्थापक भाई परमिंदर सिंग सचदेव यांनी आभार मानले,लंगर (महाप्रसाद)चा लाभ शेकडो भाविकांनी घेतला, याप्रसंगी शीख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *