कन्हालगाव येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – तालुक्यातील कन्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवार दि. १५ ला सकाळी दहा वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबाजी वासेकार यांचा कापूस वेचणी झाल्यानंतरचा कापूस जुन्या घरात साठवून होता. आज दहा वाजता दरम्यान अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तेथील ५ क्विंटल कापूस , दरवाजा , कवेलुचे तीन पत्राचे नुकसान झाले. त्याची अंदाजे किंमत ५८ हजार रुपये वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी तलाठी कमलवार , पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *