Home
Home गडचांदूर / कोरपणा राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर:-राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय गडचांदूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव थिपे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे,महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य श्री विजय आकनुरवार,वाचनालयाचे सचिव श्री मनोहर बुरान आदी मान्यवर उपस्थित होते, सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन वाचनालयाचे ग्रंथपाल श्री नागेश रोहणे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here