रामनवमी निमित्ताने राजुऱ्यात शोभायात्रा.

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– रामनवमी निमित्ताने राजुरा शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील उईक चौक” येथून निघालेल्या या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरातील रस्ते नक्षीदार रांगोळ्या आणि पुष्पवर्षावने सजलेले होते. रामनामाच्या जयघोषाने परिसर राममय झाले होते. यावेळी उपस्थित भक्तगणांना मसालेभात व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती गजानन भटारकर, डॉ. राजेश कतवारे, मुक्तेश्वर श्रीकुनडावार, मनोज मिश्रा, धनराज हेपट, सुनील कुडे, नितीन चौधरी, संतोष गोखरे, सोनू आकडे, दशरथ उईके, राजू वाघमारे, दिनकर रागीट, अनिल गंपवार, संजय भटारकर, राजू हेडाऊ, विलास कुंबरे, राजू देवाडकर, संतोष भटपल्लीवार, परशुराम भटारकर, प्रवीण विधाते, राजू गिरटकर, मिंटू टेकाम, प्रणय विरमलवार, उद्धव टेकाम, विजय भटारकर‌, माऊली शारदा महिला मंडळ पेटवार्ड राजुरा, डॉ. वैशाली कतवारे, नमिता भटारकर, ज्योती रागीट, पल्लवी धोटे, प्रीती भटारकर, पिंकी कोंडावार, स्वाती गोखरे, संगीता भटारकर, नयना आखरे, सपना विरुटकर, शिला भटारकर, माया रागीट, रश्मी साठवणे, बेबी रागीट, हर्षिता साठवणे, रेवती गोखरे, भावना रागीट, प्रतीक्षा रागीट, विद्या भटारकर, अल्फा जैन, उर्मिला देवाडकर, चंदा रागीट, स्वाती चन्ने, सुचिता धोटे, धोटे ताई, अनु टेकाम, प्रभा रागीट, माऊली शारदा महीला मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यासह शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *