आलवसा फाऊडेशनचा आठरावा व छत्रपती फाऊडेशनचा तिसरा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला*

लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात

आलवसा फाऊंडेशन चा अठरावा व छत्रपती फाऊंडेशन चा तिसरा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात *AFP (आलवसा फाऊंडेशन)* च्या लोगो चे लोकार्पण करण्यात आले. हे लोकार्पण व वर्धापन दिन साजरा होत असताना, मेघना अडसूळ या लहानग्या मॉडल च्या डान्स ने सुरुवात करण्यात आली व तसेच रेशमा पाटील मिसेस ग्लॅमर इंडिया 2021 व गणेश भरडेस्टाईल आयकॉन इंडिया विनर 2021 यांच्या नियंत्रणात फॅशन शो सादर करण्यात आला. या शोमध्ये शो – स्टॉपर म्हणून आहान देवाडीगा मिसटर एलिगलेन्त आयकॉन ऑफ महाराष्ट्रा 2012 यांनी भूमिका केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रोहित शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे माझी गृहराज्यमंत्री मा. रमेश दादा बागवे उपस्थित होते. तसेच रक्तदाता रामभाऊ बांगड, नगरसेवक मा अविनाश बागवे, मा अशोक लोखंडे, मा अनिल हातागळे, मा नंदकुमार राऊत, मा धनाजी चन्ने, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर भडकवाड तसेच सर्व पदाधिकारी व सभासद आणि इतर मान्यवर वर्ग उपस्थित होता. याप्रसंगी आलवसा फाऊंडेशनच्या वतीने मा विनायक दादा गायकवाड (सांगली) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात विविध ठिकाणी विविध विषयांवर 3000 पेक्षा जास्त वेळा व्याख्यान तर तेराशे वेळा पेक्षा जास्त विविध ठिकाणी सूत्रसंचालक म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. आणि हे करतअसताना समाजातील अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. तसेच पर्यावरणासाठी मेहनत मा राजीव पाटील हे स्वतःफिल्म निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते असून, चांदोली अभयारण्य हे जगाच्या पाठीवर कसे वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे दाखवण्यातसाठी अमेझिंग चांदोली ची निर्मिती करून चांदोली अभयारण्यातील वनस्पती, जीव आणि जीवनशैलीची माहिती जगापुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत व्हिएतनाम या देशाने त्यांच्या देशातील जगला जंगलाची वैशिष्ट्य जगापुढे आणण्याचा प्रकल्प मा राजीव पाटील यांच्या कडे दिला आहे. मा मोहिनी मोहिते या आपल्या अतिशय कठोर परिश्रमातून पत्रकार झाल्या. पत्रकारिता करत असताना समाजातील अडीअडचणींना वाचा फोडणे, जे विषय दुर्लक्षित आहेत पण ते समाजापुढे, शासनापुढे येणे आवश्यक आहे, अशा विषयांना शासनापुढे आणण्याचा प्रयत्न करत पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम करतात. महिलांच्याt विषयात लढा देत महिला सबलीकरणासाठी कार्य करत इतर समाज कार्यातही त्यांचा पुढाकार प्रा. बाळासाहेब विभूते यांनी शिक्षणाला महत्त्व देतt सर्वसामान्य माणसाला शिक्षण सहज व कमीत कमी खर्चात मिळावं यासाठी शिक्षण संस्थेची निर्मिती केली. व शिक्षणाच्या माध्यमातून सेवा देत असताना नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करत, नामाणसाच्या शरीराला होणारे विविध आजार का होतात व ते होऊ न देण्या साठी दिनक्रम कसा असावा, यासाठी ते मार्गदर्शन पर शिबिरे घेतात. मा विनायक भिसे हे दलित समाजात व विशेषतः मातंग समाजात समाज प्रबोधन पर कार्य करतात. दलित समाजातील अनेक विषयात वाचा फोडत त्या सुधारण्याचे कार्य करतात. अशा विविध प्रकारे कार्य करणाऱ्या वरील पाच मान्यवरांना आलवसा फाऊंडेशन च्या वतीने आलवसा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेघना अडसूळ लिटिल मिस फॅसीफीक वर्ल्ड 2022 या चिमुकलीने मलेशिया येथे बेस्ट टॅलेंट स्पेशल अवार्ड आणि Bu स्पेशल अवार्ड असे दोन पुरस्कार जिंकूनr भारताचे नाव मोठे केल्या बद्दल विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मा नंदकुमार राऊत यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्या बद्दल माहिती दिली. गाथा भडकवाड याr लहान मुलीने मराठीतून, तर तनया खलसे या लहान मुलीने इंग्रजीतून श्रीमती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहितीपट सादर केला. माजी गृहराज्यमंत्री मा रमेश दादा बागवे यांनी सर्व पुरस्कारार्थि व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आलवसा फाऊंडेशन चे कार्य मोठे आहे अठरा वर्षे ते कामकरतात व समाज प्रबोधन करतात. हे कार्य करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करत मोठ्या जिद्दीनं कार्यपुढं नेत आहेत व आपल्या कार्यातून महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये पसरवत आहेत असे मत मांडले. नगरसेवक मा अविनाश बागवे यांनी आपले मत मांडताना शुभेच्छा देत कोणतीही अडचण आली तरी आम्ही सोबत आहोत अशी ग्वाही दिली. इतरही मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आलवसा फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष शंकर भडकवाड यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून देत आभार व्यक्त केले. तसेच आलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशन व AFP च्या माध्यमातून अजून समाज सेवा करण्याची खात्री दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित कांबळे यांनी केले, तर आभार राज पायगुडे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *