पहिल्या ‘आधार कार्ड’चा मान असलेले मराठी गाव

by : Narendra Gayakwad, Nagpur

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. कोणतेही शासकीय किंवा महत्त्वाचे काम करण्यासाठी आधार कार्डची गरज  भासते. पण तुम्हाला माहिती आहे का ज्या आधार कार्डवर आपली अनेक कामे होतात, ते आधार कार्ड भारतात पहिल्यांदा कोणाला मिळालं ?
भारतात पहिलं आधार कार्ड मिळवणाऱ्या महिलेचं नाव आहे रंजना सोनावणे.
मुंबईपासून ४१६ कि.मी. अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील तांभाळी गावातील एक झोपडी. त्या झोपडीत राहणाऱ्या रंजना सोनावणेचं नाव तसं त्या वस्तीबाहेरही कुणाच्या कानी जाण्याची शक्यता नव्हती. पण २९ सप्टेंबर २०१० या दिवसानं या झोपडीला आणि तिला एक देशव्यापी ‘ओळख’ मिळवून दिली. या दिवशी देशातले पहिले आधारकार्ड रंजनाच्या हाती ठेवल्या गेले आणि त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. आधार क्रमांक मिळविणा-या त्या देशातील पहिली नागरिक ठरल्या.
देशभर ‘आधार’च्या न्यायालयीन भवितव्याची चर्चा रंगत असतानाच ‘आधार’च्या या जन्मगावी पाऊल ठेवलं तेव्हा ‘आधार’च्या उत्साहाच्या एकेकाळच्या खुणादेखील पुसल्या गेल्या होत्या. ‘आधार’चा फारसा उपयोग नाही असाच गावातल्या प्रतिक्रियांचा अन्वयार्थ होता.
भारतात पहिलं आधार कार्ड मिळालेल्या, तीन मुलांची आई रंजना आणि त्यांचे पती सदाशिव शेतात काम करतात. १२ अंकी क्रमांकाने महत्वाच्या योजनेत तसेच कामात खूप गोष्टी दिल्यात असं सांगणा-या रंजना सोनवणे राहत असलेल्या गावात देशातील पहिली १० आधारकार्डे २९ सप्टेंबर २०१० मध्ये समारंभपूर्वक तेव्हाचे पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीने वितरित केली गेली होती.

: नरेंद्र गायकवाड, नागपूर

– संकलित.
फोटो साभार – गुगल

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *