उपसरपंच सुजित तांडेल यांनी भरविलेल्या उपसरपंच चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 23 हल्लीची पिढी ही मोबाईल मध्ये व्यस्त झाली आहे.तासोनतास मोबाईल मध्ये गुंग झाली आहे. अशा तरुणांना, मुलांना शारिरीक खेळाकडे वळवून कबडडी सारख्या भारतातील देशी खेळा विषयी आवड निर्माण करावे,शारीरीक देशी खेळाविषयी जनजागृती व्हावी, कबडडी सारख्या देशी खेळाला प्रोत्साहन मिळावे. कबड्डी स्पर्धेतून उत्तमोत्तम गुणी खेळाडू तयार व्हावेत. स्पर्धेतून खेळत खेळत खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकावेत आदी हेतू डोळ्यासमोर ठेवून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित तांडेल यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच रायगड जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जनतेचा रसिक प्रेषक व खेळाडूंचाहि उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

पागोटे येथे भरलेल्या रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकूण 16 संघानी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनेक संघात अटीतटीचा सामना रंगलेला पाहावयास मिळाला.उपसरपंच चषक पागोटे उरण आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत पहिला क्रमाक – श्री हनुमान चरी, दुसरा क्रमांक – नवकिरण भेंडखळ,तिसरा क्रमांक – सगुनाबाग नेरळ,तर चौका क्रमांक श्री गणेश शिर्की यांनी पटकाविला. यावेळी वैयक्तिक बक्षीसेही देण्यात आली.यामध्ये उत्कृष्ट खेळाडू करण भगत (चरी),उत्कृष्ट चढाई हर्षद (नेरळ), उत्कृष्ट चढाई अमित ठाकूर (भेंडखळ), पब्लिक हिरो – मंथन म्हात्रे (शिर्की ) यांनाही वैयक्तिक बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ तांडेल, जेएनपीटीचे विश्वस्त रवि पाटील , पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सूजित तांडेल, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कडू, विक्रांत कडू,ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक पाटील यांनी केले. यावेळी सुंदर व उत्तम असे नियोजन केल्याने, कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी झाल्याने उपस्थित सर्वांनी, ग्रामस्थ, खेळाडूंनी उपसरपंच सुजित तांडेल यांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *