Home
Home Breaking News कोनसरी स्टील प्लांटची क्षमता वाढवून स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी ♦️आमदार सुभाष...

कोनसरी स्टील प्लांटची क्षमता वाढवून स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी ♦️आमदार सुभाष धोटेंची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– सुरजागड लोह प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्य़ातील बेरोजगारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील निर्माणाधीन स्टिल प्लांट ची क्षमता वाढविण्यात यावी. तसेच या प्लांटला जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांट प्रमाणे क्षमतापूर्ण करण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की आ. धोटे यांनी केलेली कोनसरी प्लांटची क्षमता वाढवण्याची सूचना स्वागतार्ह असून राज्य शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.
आमदार सुभाष धोटे हे चंद्रपूर – गडचिरोली जिल्हय़ात मोठे उद्योग, प्रकल्प उभे राहून स्थानिक बेरोजगार तरुणांना त्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावे. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी प्लांटची स्थिती केवळ मृगजळ ठरू नये. राज्य शासनाने विशेष लक्ष देऊन येथे जमसेदपूर येथील टाटा स्टील प्लांट प्रमाणे येथे सुद्धा उत्पादन सुरू झाल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन परिसरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळेल या उद्देशाने या प्लांटला क्षमतापूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here