Home
Home Breaking News आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा. ...

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा. ♦️विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार.

लोकदर्शन 👉मोहन. भारती

राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दि. २० मार्च २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा घेराव आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्य़ातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव याज्ञवलक्य श्रीकांत जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने होणारे विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसने निर्धार केला व मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव शिवानी वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे नवीन प्रभारी अभिषेक धवड व प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव कुणाल चहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीचे आयोजक चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोड़ो, हात से हात जोडो अभियानांतर्गत जिल्हा युवक काँग्रेसची कामगिरी, माझे गाव माझी शाखा उपक्रम तसेच युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती सादर केली, बैठकीला ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची गर्दी व प्रतिसाद जोशाने भरलेला दिसला.
या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अॅड्डूर, चंद्रपूर जिल्हा NSUI जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, चंद्रपूर जिल्हा महासचिव प्रणय लांडे, चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष विनोद वाघमारे, राजुरा तालुका अध्यक्ष इर्शाद शेख, सोशल मीडिया युवक प्रमुख सचिन उपरे, उमेश गिनेलवर, अखिल गेडाम, सुमित आरेकर, राजुरा शहर अध्यक्ष अशोक राव, गडचांदुर शहर अध्यक्ष रुपेश चुधरी, निखिल राऊत, अभिजित वातघुरे, अमोल देबातवार, राज पोटदुखे, सौरभ मून, तौफिक शेख, शुभम ठेंगणे, रोशन मारपे, सूरज तुरांकर, शैलेश जुमनाके, धीरज खाडिलकर यासह चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here