जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळागौरी व जास्वंदी महिला बचत गटाकडून नानानानी पार्क खोपटे येथे स्वच्छता अभियान.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 9
8 मार्च 2023 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भावना कैलास म्हात्रे माजी सरपंच खोपटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळागौरी महिला बचत गट व जास्वंदी महिला बचत गट यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावातील नानानानी पार्कची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवून व स्वच्छतेचा संदेश देत महिला दिन साजरा केला. या स्वच्छता अभियानात रंजना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे , हिरावती म्हात्रे , जयश्री म्हात्रे, जागृती म्हात्रे,प्रगती म्हात्रे,सुनीता म्हात्रे,कल्पना म्हात्रे,दिपाली ठाकूर, कु.स्विटी यांनी खुप मेहनतीने सर्व बाटल्या डिश पालापाचोळा व कचरा जमा करून व टँकरच्या पाण्याने सर्व रस्ता व सभागृह स्वच्छ केले. केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे समाधान सर्व महिलांच्या चेहर्‍यांवर आनंदच्या स्वरूपात दिसत होते.स्वच्छता अभियान राबवून महिलांनी चांगल्या उपक्रमांचे आयोजन केल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *