दिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न.

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बल्लारपूर :
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आज कालच्या युवा मध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसं होता येईल, येथे काम कसं मिळते, कोणाला किती मानधन असते? या क्षेत्रातील शिक्षण कुठे मिळतं? याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अपूर्ण मार्गदर्शनामुळे कित्येक युवा कलाकारांची दिशाभूल होते. युवा कलाकारांना ते योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचं भविष्य कला क्षेत्रात घडावं म्हणून बामणी येथील मॉन्टफोर्ट हायर सेकंडरी स्कूल मध्ये दोन दिवसीय नाटक व चित्रपट निर्मिती कार्यशाळा 20 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली. युवा दिग्दर्शक तसेच लेखक व कवी अनिकेत परसावार याच्या उपस्थितीत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रदर प्रेम कुमार (उप मुख्याध्यापक) व ब्रदर एम. ए. अँथोनी (मुख्याध्यापक) यांनी केले. या मध्ये दिग्दर्शक अनिकेत परसावार यानी चित्रपट व नाटक लिखाण, कॅरेक्टर आणि ऑब्झर्वेशन, ऑडिशन कसे द्यायचे, अभिनय कसा करायचा, अभिनयाचे ९ रस ही सर्व माहिती कार्यशाळेत त्यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये एकुण पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिग्दर्शक अनिकेत परसावार सध्या त्यांच्या आगामी चित्रपट डफ वर काम करीत आहे. चित्रपटाची कथा विदर्भीय लोकांच्या जीवनावर आधारित आहे, असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *