महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई च्या राज्यव्यापीअधिवेशनाच्या पूर्वतयारीची बैठक इचलकरंजीत संपन्न*

 

लोकदर्शन इचलकरंजी👉 -गुरुनाथ तिरपणकर

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे नववे राज्यव्यापी अधिवेशन इचलकरंजी येथे दिनांक १४ व १५ मे २०२३ रोजी हम्पी येथील देवांग पिठाचे मठाधीपती श्री.दयानंदपुरी महास्वामीजी यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी स्थानिकांची पहिली प्राथमिक बैठक इचलकरंजी येथील देवांग मंदिर येथे उत्साहात पार पडली.
सदर बैठकीचे आयोजन महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई व श्री देवांग समाज (रजि) इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सभेची सुरुवात राज्याचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते मुंबईती उद्योगपती व कोष्टी समाज सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश शेठ कांबळे यांच्या हस्ते चौंडेश्वरी मातेस हार अर्पण करून सुरुवात झाली. त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना समाज संघटना बांधण्यासाठी दीर्घकाळानंतर हे होत असलेले अधिवेशन समाजविकासासाठी खूपच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्ष स्थानी देवांग समाज अध्यक्ष श्री विश्वनाथ मुसळे होते, त्यांनी मार्गदर्शन करताना कोष्टी समाजाचे इचलकरंजी येथे होत असलेले राज्यव्यापी अधिवेशन हा एक चांगला उपक्रम असून, ते यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी श्री चौंडेश्वरी मंदिर भेटी व कोष्टी समाज बांधव जनसंपर्क अभियान महाराष्ट्र दौऱ्याची सविस्तर माहिती दिली व मंडळ कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत घेतलेले सामाजिक उपक्रम उदाहरणार्थ मंदिर सजावट स्पर्धा, वस्त्रोद्योग परिषद, शिक्षण परिषद, आरक्षण विषयक परीषद, इत्यादी ची माहिती देऊन पुढे हाती घेणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांची माहिती दिली.व राज्यातील प्रमुख समाज बांधवांची अधिवेशन तयारीची बैठक रविवार दि.५/२/२०२३ रोजी इचलकरंजी मध्ये घेणेचे ठरले. प्रथम स्वागत महासचिव श्री रामचंद्र निमणकर यांनी केले. याप्रसंगी कोष्टी प्रीमियर लीगचे अध्यक्ष राहुल सातपुते, तसेच चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्री महेश सातपुते, चौंडेश्वरी कला महोत्सव चे श्री प्रवीण होगाडे, पंडित ढवळे,श्रीनिवास फाटक, तसेच महिला मंडळ अध्यक्ष सौ स्मिता सातपुते इ.नी अधिवेशन संदर्भात आपली मते मांडली. या निमित्ताने श्री संजयराव अनिगोळ, दयानंद लिपारे,महेश सातपुते, राहुल सातपुते, हेमंत आमणे.स्वप्निल ढवळे एकनाथ कडोलकर, गणेश मुसळे, सौ दीपा सातपुते इत्यादींचा सामाजिक,कला,क्रीडा,सहकार इ. क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शेवटी आभार उपाध्यक्ष राजेंद्र सांगले यांनी मांडले. कार्यक्रमास समाजाच्या विविध संस्थांचे चेअरमन,अध्यक्ष व इतर पदाधिकारी, तसेच समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,कार्यक्रमास ट्रस्टी श्रीउत्तम राव म्हेत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी, श्री शितल सातपुते, मनोज खेतमर दिलीप भंडारे ,इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.मिटींग

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *