ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ६व्या वर्ष पदार्पणा निमित्त भव्यरक्तदान सोहळा कल्याण डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात चिदानंद रक्तपेढी मध्ये रक्तदान सोहळा संपन्न.*

 

लोकदर्शन डोंबिवली-👉 गुरुनाथ तिरपणकर

रक्तदान शेत्रात गेली पाच वर्षे रक्तदान सेवा बजावणारी निस्वार्थी संस्था म्हणून ओळख निर्माण करणारी ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र 6 व्या वर्ष पदार्पणानिमित्ताने रक्तदान सोहळ्यात रक्तदात्यांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभला.
व आदर्श नियमित रक्तदाते व रक्तदान आणि सामाजिक शेत्रातील निस्वार्थ संस्थाना ग्लोबल रक्तदाते परिवारातर्फे सन्मानित करण्यात आलं.
रक्तदान शिबिराचे उदघाटन रक्तमित्र श्री. ऋतिक मालपे (अमरावती)यांच्या हस्ते करण्यात आल .आणि आपले ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक कै. आतु फर्नांडिस यांना सर्व उपस्थित रक्तमित्र ग्लोबल परिवाराने श्रद्धांजली देऊन रक्तदान शिबिराची सुरवात केली.
या रक्तदान सोहळ्यात गुरुवर्य श्री. विनय शेट्टी (थॅलेसेमिया निर्मूलन मार्गदर्शक भारत.थिंक फाउंडेशन )यांचीप्रमुख उपस्थिती व बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. रक्तदान क्षेत्रातील आदर्श रक्तदाते श्री. जयराम नाईक सर,श्री. प्रशांत म्हात्रे सर, श्री.गजानन नार्वेकर श्री. किरण म्हात्रे सर,श्री.मनीष सावंत सर विश्वास दाते सर उपस्थित होते.
या शिबीर मध्ये रक्तदान सोबत १८ ते ३० वयोगटातील रक्तदात्यांची फ्री मायनर टेस्ट करण्यात आली या साठी अर्पण ब्लडबँक यांचे सहकार्य लाभले.
सहभागी संस्था :-मा. रक्तदाता.
ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ
जनजागृती सेवा समिती संस्था महाराष्ट्र श्री. विश्वकर्मा पांचाळ,सुतार समाज डोंबिवली.
युवा सुतार प्रतिष्ठान मुंबई.
मालवणचो कटटो प्रतिष्ठान
माझा सिंधुदुर्ग आम्ही मालवणी सिंधुदुर्ग प्रतिष्ठान वरून फाउंडेशन डोंबिवली या सर्व संस्थांच्या सहभागाने हा भव्य रक्तदान सोहळा आयोजित केला. उपस्थित सहभागी सर्व सस्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच १०९ वेळा रक्तदान करणारे
श्री. सुहास सावंत (बदलापूर)
श्री. विरेंद्र जाईल (नालासोपारा) 56 वेळ रक्तदान.श्री. प्रभात महाजन(ठाणा) 40 वेळ रक्तदान श्री. मंदार पारकर 47 वेळ रक्तदान करणा-या आदरणीय रक्तदात्याना आदर्श ग्लोबल रक्तदाते पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्लोबल रक्तदाते परिवारातील व रक्तमित्र संघटना रक्तमित्र परिवारातील 25 पेक्षा जास्त रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना व नियमित रक्तदात्यांना असे एकूण संस्थेच्या वतीने 50 आदर्श ग्लोबल रक्तदाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या रक्तदान सोहळ्यात सर्व सहभागी संस्था यांचे सभासद मंडळ व आदरणीय मान्यवर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.सहभागी संस्था माझा सिंधुदुर्ग संस्थापक श्री. विकास पालव यांनी ही रक्तदान करून आपली रक्तदान सेवा बजावली. सिंधुदुर्ग प्रतिष्ठान शिलेदार उत्तम लेखक श्री. नितीन राणे यांनी ही आपलं पाहिले रक्तदान पार पाडले. सिंधुदुर्ग हिरकणी कु.सुवर्णा वायगंणकर (नालासोपारा) यांनी ही रक्तदान करून आपला हक्क बजावला.
साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कैलास दिनकर सणस कार्याध्यक्ष प्रवीण गणपत साळवी आणि सदस्य संकेत कैलास सणस यांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले दर वेळी प्रमाणे ग्लोबल मालवणी अध्यक्ष श्री. सचिन आचरेकर व डॉ. गौरी आचरेकर या दोन्ही उभयतांनी एकत्रितपणे रक्तदान केलं.
यावेळी ग्लोबल मालवणी ग्लोबल रक्तविरंगना डॉ. गौरी आचरेकर यांच्या तर्फे सर्व चिदानंद नर्स स्टाफ चा सन्मानार्थ सन्मानचिन्ह पदक देऊन गौरविण्यात आलं.
या रक्तदान सोहळ्यात नालासोपारा विरार,बदलापूर येथून रक्तदात्यांनी रक्तदान केले.शेवट चिदानंद रक्तपेढी तर्फे रक्तदान शिबीर संपन्न प्रमाणपत्र देऊन हा रक्तदान सोहळा गोड झाला. या रक्तदान सोहळा संपन्न होण्यासाठी विशेष आर्थिक सहकार्य (जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र) व
श्री. सचिन आचरेकर (ग्लोबल मालवणी) सिंधुदुर्ग रेड बटालियन याचे विशेष सहकार्य व उपस्थिती लाभली. श्री.अमित दुखंडे(आधार इंडिया) ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र संघटक श्री. किरण पुजारी, सिद्धेश मांडवकर, हेमंत मांडवकर ,श्री. सागर चव्हाण, सदानंद चव्हाण,विनायक पावसकर, तेजस पांचाळ,श्रुती उरणकर,वंदना जाधव,विजय पांचाळ.यांनी विशेष मेहेनत घेतली. ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ६व्या वर्ष पदार्पण निमित्त या रक्तदान सोहळ्यात सहभागी संस्था व सर्व उपस्थित रक्तदाते व आयोजन समिती रक्तदाते व ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सोहळा संपन्न होण्यासाठी सहकार्य दिले त्यांचे ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र परिवारातर्फे मानाचा मुजरा. आपली साथ अशीच कायम या जीवनदायी कार्यात आमच्या सोबत राहूदे हीच सदिच्छा..
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र
ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग ग्लोबल रक्तविरांगना मालवण ग्लोबल रक्तदाते गोवा यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *