



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
क्रिडा व युवक संचालनालय पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरावर रोलर स्केटिंग स्पर्धेत कार्मेल अकॅडमी, दाताला चंद्रपूर येथे 5 व्या वर्गात शिकणारी कु युगाज्ञा चरंदास रामटेके हिने रोड रेस व रिंक रेस मध्ये प्रथम क्रमांक पटकावला,व आता ती विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत,11 वर्षाखालील स्पर्धेत नागपूर येथे 5 जानेवारी ला आयोजित विभागीय स्तरावरील स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
28 डिसेंबर ला चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते वर्मा साहेब,उके सर,खोब्रागडे सर,राकेश सर,प्रवीण सर,आतिष धुर्वे सर,टिंकू सर, सोनी सर, निखाडे सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले,
युगाज्ञा ला प्रशिक्षक आतिष धुर्वे,व राकेश सर यांचे मार्गदर्शन लाभले.
युगाज्ञा ची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहेत.