आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मालेगाव येथे आगमन

By : Ajay Gayakwad

वाशिम :

मालेगाव नगरीत  25 डिसेंबर रोजी  आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मालेगाव नगरीत आगमन झाल्याने त्यांचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले.

जैन धर्माचे महान संत  श्री १०८ विद्यासागर जी महामुनीराज यांचे प्रथमच मालेगांव नगरीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती,त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यातुन जैन भाविकही महाराजांच्या स्वागतासाठी आले होते. आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे मालेगांव येथे आगमन होताच संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण होते. आचार्य श्री विद्यागर महाराज यांचे दि.२५ रोजी रविवार दुपारी ४:४५ वाजता आगमन झाले. तेथे हजारो भाविकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. आचार्य श्री ज्या रस्त्याने बाहेर पडले त्या रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या लोकांनी त्यांचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानले. आचार्य श्रींचा रात्रीचा विश्राम दिगंबर जैन मंदिर समोर देशभूषण देविदास सावले यांच्या वास्तुमध्ये झाला. येथे पोहोचले जिथे विद्यासागर महाराज यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांच्या वतीने आचार्य श्रीं चे पूजन करण्यात आले. यावेळी आचार्य श्री संबंधित भक्तिगीते सादर केली. आचार्य श्री महाराजांसोबत तिन निर्गंथ होते.

संत शिरोमणी विश्वनंदणीय आचार्य भगवंत श्री १०८ विद्यासागर जी महामुनिराज निरापक श्रमण मुनि श्री 108 प्रसादसागर जी महाराज मुनि श्री 108 चंद्रप्रभसागरजी महाराज मुनि श्री 108 निरामयसागर जी महाराज यांचा दि.२५ शिरपुर येथुन मालेगांव येथे ते ज्या रस्त्यावरून आले त्या रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे मालेगांवच्या जैन मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली तर वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या भव्यदिव्य स्वागत कुणालाच झाले नाही दि.२५ डिसेंबर रोजी शिरपूर येथून मालेगांवत आचार्य श्रीचे पदारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हे देखील मोठ्या संखेच्या प्रमाणात विशेष म्हणजे नभुतो ना भविष्यती असा मालेगांवकरांचा आनंद झाला आहे या वेळी समस्त जैन युवा युवती मंडळ व तसेच पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते त्यांना जिल्हा प्रशासन आणि मालेगांव पोलिस प्रशासना कडूनही पुरेसा बंदोबस्त देण्यात आला होता यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावली आणि सर्व पक्षांचे राजकारणी व व्यापारी या आचार्य श्रीच्या दर्शणघेण्याकरीता सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *