विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा ध्यास घ्यावा  : प्रा. अवचार यांचे मार्गदर्शन 

By : Ajay Gayakwad

वाशिम :

आजचे विद्यार्थी हे एक परावलंबी बनत चालले असुन त्यांना त्यांचा डबा भरण्या पासुन तर स्कुलबस पर्यंत नेऊन सोडण्याची सर्व कामे आई – वडीलांना करावे लागतात . आतापासुनच दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय ही तुमच्या भावी आयुष्यामधे अतिशय घातक ठरू शकते .त्यामुळे तुम्हाला जर जिवनात प्रगती करायची असेल तर इतरांवर अवलंबुन न राहता स्वावलंबी बना . आणि ही सवय बालपणातच लावा . अशा प्रकारचे आवाहन प्रा . वसंतराव अवचार यांनी मालेगांव येथील विदर्भ पब्लीक स्कुल मधे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले.
विदर्भ पब्लिक स्कूल मालेगाव मधे स्पोर्टस विक चे आयोजन करण्यात आले होते . त्याचा बक्षीस वितरण समारंभ २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश काळे हे होते . तर प्रमुख मार्गदशक व उद्‌घाटक प्राचार्य वसंतराव अवचार होते . तसेच संस्थेच्या सचिव सौ काळे मॅडम व प्राचार्य मालोकार यांची प्रमुख उपस्थिती होती . अतिशय देखण्या व शिस्तबद्ध सोहळ्यामधे धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या . त्यानंतर आठवडाभर झालेल्या विविध खेळांच्या विजेत्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन प्रा . वसंतराव अवचार यांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की , विद्यार्थी जिवना मधे शिस्त व वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे . या वयात जर शिस्त व वेळेचे महत्व आपण जाणुन घेऊन त्याचे पालन करायला शिकले तर आयुष्या मधे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही . या वयात अभ्यासा बरोबरच खेळाला सुद्धा महत्व दिले पाहिजे . खेळामुळे मन मनगट आणी मस्तक सशक्त राहते व शरीर तंदुरुस्त राहुन दिर्घ आयुष्य लाभते . असे सांगुन ते पुढे म्हणाले की , मालेगांव सारख्या लहान गावात विदर्भ पब्लीक स्कूल सारखी चांगली व उच्च दर्जाची शाळा सुरू करून पालकांची व विद्यार्थ्यांची सोय जगदीश काळे यांनी करून दिली त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत . असेही ते म्हणाले .
कार्यक्रम व क्रिडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *